[Utente disattivato]
my मराठी 'My मराठी' ....हे वाचनच जरा खटकतंय ना !!! तुम्ही विचारकरत असाल की मी हे असं का लिहिलंआहे, कारणसध्या महाराष्ट्रात 'माय मराठी' नव्हे, तर 'My मराठी' आहे. "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे शिव-छत्रपती शिवाजी महाराजांचं सूत्र आहे. शिवरायांनी इ. स.१६४२ च्या सुमारास स्वराज्य स्थापनेची सुरवात केली.त्या काळात पारसी भाषेचा प्रचंड प्रभाव होता, परंतु राज्यव्यवहाराची भाषा मराठी असल्याने मराठीचच प्रभुत्व राहिलंगेलं. पण सध्या याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी भाषेची होणारी गळचेपी तसेच मराठी कडे होणारेदुर्लक्ष पाहता सर्वांनाच महाराजांच्या या सूत्राचा विसरपडलेला दिसत आहे. अहो तुम्हीच पाहा ना....आज लहान मुलांच्या शाळेपासून तेमोठ्यांच्या नोकरी-धंद्या पर्यंत एकच सिध्दांत दिसूनयेतो तो म्हणजे, 'इंग्रजी शिकूयाआणि मराठी विकुया.''आपली बोली - आपला बाणा, मी मराठी'हे आता फक्तबोलण्यापुरते किवा ऐकण्यापुरतेच राहिले आहे. शिव-छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूत्राला आज खरोखरच तडे जात आहेत. आज महाराष्ट्रात'मराठी भाषी कमी आणि हिंदी भाषी धनी' हेच समीकरणपाहायला मिळत आहे. आश्चर्याची गोष्ट हीच की, हे एवढंपाहूनही सर्व मराठी मावळे अजून गप्पच.... आता या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण???,माझ्या या प्रश्नाच उत्तर अगदी सोपं आहे,या अशा परिस्थितीला दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आपणस्वतःच जबाबदार आहोत. कारण आपण आज खूप शिकलोयत्यामुळे आपल्यालाच मराठी बोलण्याची लाज वाटते...हल्ली कोणाशीही सहज जरी बोलायला गेलं तर प्रामुख्याने हिंदी - इंग्रजीचाच वापरकेला जातो आणि तेही मराठी माणसांच्याच तोंडून ...!!! त्याचंउत्तर नेहमी ठरलेलंच असतं "ya I am Maharashtrian, butI can't speak Marathi" तुम्हीच सांगा आता, कायमोठया हुद्द्यावर गेलेला मराठीमाणूस "मराठी भाषा" विसरूशकतो???, काय तो हुद्दा त्यांना मराठी बोलू नका असं सांगतो???, नाही ना..... मग हि अशी मराठी भाषेशी तडजोडका?, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा " माय मराठी नाहीतर Myमराठी"...... आपणही या सर्वांच्या मध्ये येतो कारण, टाक्सिवाले,रिक्षावाले, भाजीवाले यांच्याशी बोलताना हिंदीतूनचबोलतो ना..... अहो बोला त्यांच्याशी मराठीतून, पाच-सहा वेळा विचारा त्यांना मराठीतूनच, सातव्यांदा त्यांनाकळेलंचकी तुम्ही काय बोलत आहात ते आणि जरी नाही कळलं तरत्यांना हे समजून चुकेल की तुम्हाला मराठीचा किती अभिमान आहे तेआणि त्यांना हि भाषा शिकणे कितीगरजेच आहेतेही...सध्याची हि अवस्था हा महाराष्ट्र आपला राहिलाचनाही अशी दाखविणारी आहे. परंतु सर्वच मराठी लोक असे नाहीत...अजूनही बरेच लोक असेआहेत ज्यांना माझा महाराष्ट्र म्हणण्यात गर्व वाटतो,ज्यांना महाराष्ट्राचा अभिमान आहे, ते स्वतः मराठीतचबोलतात आणि वेळ आल्यावर मराठीवर सुध्दा बोलतात,आणि असेही काही लोक आहेत जे महाराष्ट्राचेरहिवासी नसताना देखील खूप छान प्रकारे मराठी बोलतात. अहो आपलेच काही बांधव जे परदेशात राहतात परंतुतरीही त्यांची मराठी कितीतरी छान असते.मला कोणत्याही भाषेबद्दल द्वेषनाहीये,मला मराठीचा अभिमान आहे.तुम्ही विकासासाठी किवा प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानशिका, इंग्रजीत प्राविण्य मिळावा, परंतु मराठीलाही तितकच प्राधान्य दया. "गर्व आहे मला यामहाराष्ट्राच्यामातीचा,सुखाने येथे नांदणाऱ्या बहुगुणी जातीचाजरी असंख्य रंग चढविले गेले याचमराठीबोलीला,पण लक्षात ठेवा जावू देणार नाहीतडाआम्ही महाराष्ट्राच्याया ख्यातीला......." सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की,"मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा" हेसूत्र आणि "मराठी माणूस" या दोन्ही गोष्टी जरमहाराष्ट्रात टिकवायच्या असतील तर आता पासूनचतुम्ही स्वतः सुरवात करा, जास्तीत जास्त मराठीचा वापर करा,मग समोर कोणताही परप्रांतीय असला तरी हरकत नाही, पण सुरवात जरूर करा.... नाहीतर खरोखरच "आपलीबोली - आपला बाणा""मराठी पाऊल पडते पुढे" हे सर्व इतिहासात जमा होईलआणि तो इतिहास सांगताना आपल्यालाच "माय मराठी' नव्हे,तर 'My मराठी" असा सांगावा लागेल...
2 nov 2013 14:16
Correzioni · 1
भारतात अनेक भाषा आहेत. मी मराठी भाषा जाणून घेऊ इच्छित आहे कारण मी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले बद्दल जाणून घेऊ इच्छित आहे.
4 novembre 2013
Vuoi progredire più velocemente?
Unisciti a questa comunità di apprendimento e prova gli esercizi gratuiti!